शेअर बाजारामध्ये पेनी (Penny) स्टॉक म्हणजे काय ?

शेअर बाजारामध्ये पेनी (Penny) स्टॉक म्हणजे काय ?

तुम्ही शेअर बाजार मध्ये लोकांकडून नेहमी ऐकले असेल कि “हा पेनी स्टॉक एवढा वाढला”, “ह्या पेनी स्टॉक मध्ये गुंतवणूक केली पाहिजे”, “पेनी स्टॉक खूप स्वस्त असतात त्या मुळे आपण जास्त शेअर घेऊ शकतो” वैगेरे-वैगेरे.

ह्या मराठी लेख मधून तुम्हाला पेनी (Penny) स्टॉक म्हणजे काय ? तुम्हाला ह्या मध्ये निवेश केला पाहिजे किंवा नाही, आणि त्यात गुंतवणूक आणि ट्रेडिंग संबंधित जोखीम काय आहेत? हे तुम्हाला कळेल.

बहुतेक पेनी स्टॉक दीर्घकाळासाठी निरुपयोगी असतात.

जे नवीन ट्रेडर किंवा गुंतवणूकदार असतात, ते पेनी स्टॉककडे आकर्षित होतात, कारण त्यांच्या किमती कमी असतात आणि त्यामध्ये ट्रेडिंग आणि गुंतवणूक करण्यास सुरुवात करतात.पेनी स्टॉक असे स्टॉक असतात,ज्यांच्या शेअरची किंमत खूप कमी असते .ज्या शेअरची किंमत २० ते २५ रुपयांपर्यंत असते त्यांना पेनी स्टॉक म्हणतात.

1.एखादा स्टॉक पेनी स्टॉक कसा बनतो?

बरेच लोक चुकीचे समजतात की, हे पेनी स्टॉक स्मॉल कॅप कंपन्या आहेत परंतु ते चुकीचे आहेत.

उदाहरणार्थ, जर तुम्ही IDEA, R.Com, Yes Bank ह्या कंपन्या पाहिल्या तर, ह्या लार्ज कॅप कंपन्या आहेत आणि पूर्वी हे स्टॉक देखील NIfty 50 मध्ये समाविष्टहोते , परंतु आज ते पेनी स्टॉक आहेत.

1.पेनी स्टॉक बनण्याचे कारण

तीन मुख्य कारण आहे, ज्या मुळे कंपन्यांचे स्टॉक पेनी स्टॉक बनतात.

  • आपापसात होणारी स्पर्धा.
  • खराब व्यवस्थापन
  • अंतर्गत भ्रष्टाचार

जसे हि गुंतवणूकदारांना ह्या गोष्टी समझतात तर ते आप ले पैसे त्या स्टॉक मधून काढून घेतात. त्यामुळे त्या स्टॉकची किंमत कोसळते आणि तो पेनी स्टॉक बनतो.

उदाहरणार्थ,

जेव्हा एखाद्या कंपनीचा व्यवसाय नीट चालत नाही,जसे कि,

  • Jio आणि Airtel सोबतच्या स्पर्धेने Vodafone Idea Ltd ला पेनी स्टॉक बनवले.
  • खराब व्यवस्थापनाने R.Com ला पेनी स्टॉक बनवले.
  • भ्रष्टाचारामुळे Yes Bank पेनी स्टॉक बनली.

आणि कंपन्यांचे स्टॉक पेनी स्टॉक बनण्याचे इतर अनेक कारण आहेत.

2. ५ कारणे ज्या मुळे पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक आणि ट्रेडिंग करू नये ?

पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक आणि ट्रेडिंग न करण्याचे ५ कारण खाली दिले आहेत:-

५ कारणे ज्या मुळे पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक आणि ट्रेडिंग करू नये - Marathi

१. तुम्ही आत्ता वाचले की, एखाद्या कंपनीचे व्यवस्थापन खराब असेल, भ्रष्टाचार झाला असेल किंवा एखाद्या स्पर्धेत मागे राहिल्यामुळे त्या कंपनीतुन गुंतवणूकदार पैसे काढून घेतात. त्यामुळे स्टॉक पेनी स्टॉक बनतो.

२. ह्या सर्व कारणानं मुळे कंपनीच्या व्यवसायावर फरक पडतो आणि तो व्यवसाय पहिल्या सारखा करणे कंपनीला खूप अवघड जाते,ह्या कारणाने कंपनी नफा करू शकत नाही.

३. जर कंपनी नफा करू शकत नाही तर ती कंपनी गुंतवणूक दारांना कसा नफा मुळवून देईल. त्या मुळे पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक आणि ट्रेडिंग करू नये.

४.लोकांना वाटते की या शेअरची किंमत खूपच कमी आहे, यामुळे लोक चांगल्या कंपनीत ट्रेडिंग किंवा गुंतवणूककरण्याच्या ऐवजी पेनी स्टॉकला निवडतात.

५.लोकांना वाटते की पेनी स्टॉक हे मल्टीबॅगर स्टॉक आहेत आणि भविष्यात त्यांना मल्टीबॅगर रिटर्न मिळेल. पण शेवटी त्यांचे पैसे डुबून जातात.

ज्या शेअरची किंमत 400 ने 10 रुपयांपर्यंत कोसळते , तो शेअर 400 रुपयांपर्यंत कधीही जाणार नाही.

3. पेनी स्टॉकमध्ये ऑपरेटरचे नियंत्रण.

ऑपरेटर ही अशी व्यक्ती असते ज्याच्याकडे जास्त पैसा असतो आणि तो स्वतःच्या पैशाने पेनी स्टॉक नियंत्रित करतो.

पेनी स्टॉकमध्ये ऑपरेटरचे नियंत्रण.।Stock Market Operator -Marathi, Hindi

जेव्हा जेव्हा एखाद्या स्टॉक मध्ये उप्पर किंवा लोव्हर सर्किट लागतो , तेव्हा त्या स्टॉकमधील खरेदी-विक्री थांबते.

ऑपरेटर सतत एका शेअर मध्ये buying करत जातो आणि त्या शेअर मध्ये दर दिवशी उप्पर सर्किट लागत जाते आणि तो शेअर काही दिवसां मध्ये खूप वरती जातो .

सामान्य लोक हे पाहतात कि हा पेनी स्टॉक आणि वाढत आहे आणि त्यात गुंतवणूक करतात.

जेव्हा ऑपरेटर पाहतो की त्या स्टॉकमध्ये बर्याच लोकांनी गुंतवणूक केली आहे, तेव्हा तो त्याचे शेअर्स विकण्यास सुरुवात करतो.

जास्त विक्रीमुळे, स्टॉकमध्ये लोअर सर्किट लागण्यास सुरू होते आणि लोअर सर्किटमुळे सामान्य गुंतवणूकदार त्यांचे शेअर्स विकू शकत नाहीत आणि त्यांचे नुकसान होते.

त्यामुळे ऑपरेटर्स अशा प्रकारे गुंतवणूकदारांचे पैसे लुटतात.

4. NSE आणि BSE मधील टॉप पेनी स्टॉक्स Marathi मध्ये.

खाली दिलेल्या टेबल मध्ये भारतीय शेअर बाजारातील NSE आणि BSE मधील काही पेनी स्टॉक ची लिस्ट आहे.

Share NameShare Price52 Week High Price52 Week Low PriceMarket Cap.
Yes Bank14.7016.2510.5036.83TCr
Wilmar International Limited3.994.893.982.55TCr
Vodafone Idea Ltd8.9016.804.5528.55TC
Tayo Rolls Ltd91.90208.5052.1094.30Cr
Syncom Formulations India Ltd9.8019.495.76921.20Cr
Suzlon Energy Limited6.6513.105.706.51TCr
Sturdy Industries Ltd0.970.970.3414.67Cr
South Indian Bank Limited7.9512.357.251.66TCr
Sadhna Broadcast Ltd16.9516.950.97169.95Cr
Reliance Communications Ltd2.254.702.10617.46Cr
Orosil Smiths India Ltd5.2710.852.9221.77Cr
Orient Green Power Company Ltd
NSE: GREENPOWER
9.6528.452.80724.45Cr
Lesha Industries Ltd14.0830.903.50154.88Cr
Jaiprakash Power Ventures Limited6.5011.153.354.45TCr
Godha Cabcon & Insulation Ltd8.0529.751.62178.77Cr
Empower India2.520.152.75Cr
CES Ltd0.420.420.301.53Cr
Baron Infotech Ord Shs0.580.580.42
Bank of Maharashtra Ltd17.1523.9015.0011.58TCr
Alok Industries Ltd19.9535.8018.859.86TCr
Top penny stocks list in BSE & NSE In Marathi

वरती दिलेल्या टेबल मध्ये खराब स्टॉक्स असतीलच असे नाही आणि काही स्टॉक मल्टीबॅगर हि असू शकतात.

परंतु बहुतेक पेनी स्टॉक एका ऑपरेटरच्या नियंत्रणाखाली असण्याची शक्यता जास्त आहे आणि मल्टीबॅगर पेनी स्टॉक मिळणे फार कठीण आहे.

1.Penny Stock PDF In Marathi

5.निष्कर्ष

पेनी स्टॉकची किंमत कमी दिसते पण त्या किमतीमागे त्या कंपनीचे खराब काम, खराब व्यवस्थापन, भ्रष्टाचार इत्यादी अनेक कारणे आहेत.

तुम्ही गुंतवणूकदारांनी या पेनी शेअर्सपासून दूर राहावे, अन्यथा तुमची गुंतवणूक या पेनी स्टॉक्स इतकी होईल.

जर तुम्हाला हा मराठी लेख पेनी स्टॉक म्हणजे काय ? आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारसह नक्की share करा.

6.FAQ

पेनी स्टॉक म्हणजे काय?

जे नवीन ट्रेडर किंवा गुंतवणूकदार असतात, ते पेनी स्टॉककडे आकर्षित होतात, कारण त्यांच्या किमती कमी असतात आणि त्यामध्ये ट्रेडिंग आणि गुंतवणूक करण्यास सुरुवात करतात.पेनी स्टॉक असे स्टॉक असतात,ज्यांच्या शेअरची किंमत खूप कमी असते .ज्या शेअरची किंमत २० ते २५ रुपयांपर्यंत असते त्यांना पेनी स्टॉक म्हणतात.

पेनी स्टॉकच्या शेअरची किंमत कितीअसते ?

पेनी शेअर्सची किंमत २० ते २५ रुपयांच्या आत असते.

एखादा स्टॉक एक पेनी स्टॉक बनण्याची करणे काय आहेत ?

तीन मुख्य कारण आहे, ज्या मुळे कंपन्यांचे स्टॉक पेनी स्टॉक बनतात.
आपापसात होणारी स्पर्धा.
खराब व्यवस्थापन
अंतर्गत भ्रष्टाचार

पेनी स्टॉक मध्ये गुंतवणूक किंवा ट्रेडिंग का करू नये ?

एखाद्या कंपनीचे व्यवस्थापन खराब असेल, भ्रष्टाचार झाला असेल किंवा एखाद्या स्पर्धेत मागे राहिल्यामुळे त्या कंपनीतुन गुंतवणूकदार पैसे काढून घेतात. त्यामुळे स्टॉक पेनी स्टॉक बनतो.
जर तुम्ही ह्या स्टॉक मध्ये गुंतवणूक किंवा ट्रेडिंग केली तर निश्चित तुमचे पैसे डुबले जाणार म्हणून ह्या स्टॉक मध्ये गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करू नये .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *