शेअर मार्केमध्ये IPO म्हणजे काय ?

शेअर मार्केमध्ये आयपीओ (IPO) म्हणजे काय ? – कंपनीसाठी पैसे गोळा करण्याचा मार्ग .

शेअर बाजारात तुम्ही निवेश करत असाल तर तुम्ही नक्कीच IPO हा शब्द ऐकलं असाल किंवा तुम्ही IPO मध्ये निवेश सुद्धा केला असाल. पण तुम्हाला IPO म्हणजे काय ? आणि त्या बद्दलची माहिती नसेल.

ह्या मराठी लेख द्वारे तुम्हाला IPO बद्दल ची सगळी माहिती मिळून जाईल, जसेकी कंपनी साठी IPO महत्वाचा का असतो ?, शेअर मार्केट मध्ये IPO आणण्याची ची प्रक्रिया काई आहे ? कंपनी शेअर मार्केट मध्ये IPO का आणते ? IPO विकत घेण्याची प्रक्रिया काय आहे ?इत्यादी .

IPOचा full form आहे initial public offering. जर एखाद्या कंपनीला पैश्यांची गरज असेल आणि त्या कंपनीला लोकांकडून गुंतवणूक हवी असेल, तर ती कंपनी शेअर बाजारात लिस्ट करावी लागते ह्या लिस्टिंग च्या प्रक्रियेला IPO असे म्हणतात.

IPO मध्ये, कंपनी BSE किंवा NSE वर सूचीबद्ध होते आणि गुंतवणूकदार IPO मध्ये गुंतवणूक करतात, जसे की मोठ्या संस्था, मोठे गुंतवणूकदार (गैर-संस्थात्मक) आणि सामान्य गुंतवणूकदार.

1.IPO मध्ये गुंतवणूक कशी करावी ?

IPO मध्ये निवेश (Investment) करणे खूप सोपे आहे. खाली दिलेल्या माहिती नुसार तुम्ही IPO मध्ये निवेश करू शकता.

1.D-mat आणि Trading Account

तुम्हाला IPO मध्ये apply करण्यासाठी एक स्टॉक ब्रोकर कडे D-mat आणि trading account असणे गर्जेचे आहे.

2.Price –

ह्या IPO ची किंमत आहे २५ ते २६. ह्या मध्ये तुम्हाला हा IPO २५.५०,२५.६० किंवा २५.९४ ला हि भेटू शकतो.

3.Lot Size

प्रत्येक IPO मध्ये एक lot size असते आणि या मध्ये शेअर्स ची संख्या निश्चित असते. ह्या IPO मध्ये तुम्हाला एक लॉट मध्ये ५७५ शेअर भेटतील. तुम्हाला १ लॉट किंवा २ लॉट असे विकत घ्यावे लागेल. lot size ची किंमत कमीत कमी १०,००० ते १५,००० ह्या मध्ये असते . ह्या शेअर च्या लॉट ची किंमत १४,३७५ रुपये आहे .

4.Apply

हे झल्या नंतर तुम्ही apply वर क्लिक करू शकता.

5.Cut-Off

तुम्ही apply करताना जेव्हा cut -off निवडता, ह्याचा अर्थ हा झाला कि ज्या किमती वर तुम्हाला शेअर भेटतील ते घेण्यास तुम्ही तय्यारआहात .ह्या नंतर तुम्हाला जेव्हढे lot हवे असतील तेवढे टाका.

हे झल्या नंतर तुम्हे UPI द्वारे पैसे भरू शकता .

6.Subscribe

UPI द्वारे पैसे भरल्यानंरत तुम्हाला subscribe असे दिसेल .

जर तुम्ही एखाद्या IPO मध्ये apply करतात तर १००% खात्री नाही कि तो IPO तुम्हाला मिळेल. जर तुम्ही apply करतात तर तुमच्या बँके मधले पैसे त्या ipo च्या lot size नुसार कापले जातील.

जर तुम्हाला IPO नाही भेटला तर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील आणि जर तुम्हाला IPO भेटला तर शेअर तुम्हाला तुमच्या D-mat account मध्ये दिसतील.

2.एखाद्या कंपनीसाठी IPO महत्वाचा का असतो ?

जेव्हा एखादी कंपनी सुरु होते, तेव्हा तिच्या विकासासाठी त्या कंपनीचा मालक कुटुंबाकडून, मित्रांकडून आणि बँकेकडून गुंतवणूक आणतो.

जेव्हा एखादी मर्यादा येते जिथे खाजगी गुंतवणूकदारांकडून पैसे घेणे पुरेसे नसते, आणि बँके कडून पैसे घेतल्यावर व्याज नकोस वाटतो, तेव्हा शेअर बाजारातून पैसे उभे करण्यासाठी कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात आणला जातो , कारण शेअर बाजारात गुंतवणूकदारांची संख्या जास्त असते.

याशिवाय म्युच्युअल फंड, पेन्शन फंड अशा मोठ्या संस्थांकडूनही पैश्यांची गुंतवणूक केली जाऊ शकते , त्यांच्याकडे गुंतवणुकी साठी भरपूर पैसा असतो.

या सर्व गुंतवणूकदारांकडून कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी कंपनीचा IPO आणला जातो.

3.कंपनी शेअर मार्केट मध्ये IPO का आणते ?

कंपनीचा IPO शेअर मार्केटमध्ये आणण्याची 3 मुख्य कारणे आहेत.

कंपनी शेअर मार्केट मध्ये IPO का आणते

1.विस्तार

एखाद्या कंपनीला आपला व्यवसाय वाढवायचा असेल तर ती कंपनी आपला IPO आणते.

2.कर्ज

जर एखाद्या कंपनीचे कर्ज जास्त असेल, तर ते कर्ज कमी करण्यासाठी किंवा कर्ज संपवण्यासाठी IPO आणला जातो.

3.जुन्या गुंतवणूकदारांशी सुटका.

जर त्या कंपनीच्या जुन्या गुंतवणूकदारांना कंपनीतून बाहेर जायचे असेल, तर कंपनी पैसे कमी पडू नये या साठी IPO आणते .

4.शेअर बाजारमध्ये IPO आणण्याची प्रक्रिया काय आहे ?

शेअर बाजारमध्ये IPO आणण्याची प्रक्रिया खाली दिल्या प्रमाणे आहे .

1.इन्वेस्टमेंट बँक

सर्व प्रथम, जर एखाद्या कंपनीला IPO आणायचा असेल तर ती कंपनी इन्वेस्टमेंट बँकेकडे जाते.

आणि इन्वेस्टमेंट बँक ज्याला आपण मर्चंट बँक देखील म्हणतो ती त्या कंपनीचा IPO आणते.

2.कायदेशीर प्रक्रिया आणि नियम

या भागात कंपनीच्या सर्व कायदेशीर प्रक्रिया केल्या जातात आणि IPO च्या नियमांची माहिती मिळवली जाते आणि हे काम देखील गुंतवणूक बँक करते.

३.शेअरची किंमत

यामध्ये गुंतवणूक बँकेकडून कंपनीच्या मूल्यांकनाच्या (Valuation) आधारे शेअरची किंमत ठरवली जाते.

4.वितरण

या भागात, कंपनीचे शेअर्स मोठ्या संस्था, मोठे गुंतवणूकदार (गैर-संस्थात्मक) आणि सामान्य गुंतवणूकदार यांच्यात वितरीत केले जातात, जे गुंतवणूक बँकेद्वारे केले जाते.

5.शेअरचे भाग

वितरणानंतर कंपनीच्या शेअर्स चे भाग केले जातात मोठ्या संस्था, मोठे गुंतवणूकदार (गैर-संस्थात्मक) आणि सामान्य गुंतवणूकदार यांच्या मध्ये.

उदाहरणार्थ,

  • मोठ्या संस्थांमध्ये ५०% शेअर्स दिले जातात.
  • मोठ्या गुंतवणूकदारांमध्ये 15% (गैर-संस्थात्मक).
  • 35% शेअर्स सामान्य गुंतवणूकदारांना दिले जातात.

६.स्टॉक एक्स्चेंजवर शेअर सूचीबद्ध होणे.

या टप्प्यात शेअर्स BSE किंवा NSE वर सूचीबद्ध होतात.

यामध्ये,गुंतवणूकदारांसाठी बिडिंग किंवा ऑफर 3 ते 5 दिवसांसाठी ठेवली जाते.

5.निष्कर्ष

गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी आणि कंपनीच्या वाढीसाठी IPO हा शेअर बाजाराचा महत्त्वाचा भाग आहे.

शेअर मार्केटमध्ये IPO लिस्ट झाल्यानंतर त्या कंपनीच्या स्टॉकचे भवितव्य supply आणि demand च्या आधारे ठरवले जाते.

जर तुम्हाला शेअर मार्केट मध्ये IPO काय असतो? हे मराठी लेख द्वारे समजले असेल, तर हा लेख आपल्या मित्र परिवारासह नक्की share करा .

IPO बद्धल हिंदी मध्ये वाचू शकता :-IPO किसे कहते हैं ? – पैसे जुटाने का तरीका।

आयपीओ (IPO) म्हणजे काय?

जर एखाद्या कंपनीला पैश्यांची गरज असेल आणि त्या कंपनीला लोकांकडून गुंतवणूक हवी असेल, तर ती कंपनी शेअर बाजारात लिस्ट करावी लागते ह्या लिस्टिंग च्या प्रक्रियेला IPO असे म्हणतात.

आयपीओ (IPO) चा फुल्ल फॉर्म काय आहे ?

IPOचा full form आहे initial public offering.

कंपनी शेअर मार्केट मध्ये IPO का आणते ?

जेव्हा एखादी मर्यादा येते जिथे खाजगी गुंतवणूकदारांकडून पैसे घेणे पुरेसे नसते, आणि बँके कडून पैसे घेतल्यावर व्याज नकोस वाटतो, तेव्हा शेअर बाजारातून पैसे उभे करण्यासाठी कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात आणला जातो , कारण शेअर बाजारात गुंतवणूकदारांची संख्या जास्त असते.

IPO मध्ये कोण निवेश करू शकतो आणि त्यांचा वाट काई असतो ?

IPO मध्ये मोठ्या संस्था, मोठे गुंतवणूकदार (गैर-संस्थात्मक) आणि सामान्य गुंतवणूकदार हे निवेश करू शकतात.
मोठ्या संस्थांमध्ये ५०% शेअर्स दिले जातात.
मोठ्या गुंतवणूकदारांमध्ये 15% (गैर-संस्थात्मक).
35% शेअर्स सामान्य गुंतवणूकदारांना दिले जातात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *