मुहूर्त ट्रेडिंग काय असते ?

मुहूर्त ट्रेडिंग काय असते ?-दिवाळीच्या शुभ दिवशी शेअर बाजारात केली जाणारी गुंतवणूक.

ह्या मराठी लेख द्वारे, आपण जाणून घेणार आहोत शेअर बाजारातील मुहूर्त काय आहे? त्याचे महत्त्व काय आहे ?, मुहूर्त ट्रेडिंगचा इतिहास? आणि 2022 मध्ये मुहूर्त ट्रेडिंग कोणत्या दिवशी आणि वेळेला होईल ? इत्यादी.

भारतात ज्योतिषशास्त्राला खूप महत्त्व दिले जाते.

शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग हे एक धार्मिक कार्य आहे, जे दरवर्षी केले जाते . ज्यामध्ये दिवाळीच्या दिवशी शेअर बाजारात 1 तास गुंतवणूक केली जाते, कारण भारतात दिवाळीच्या दिवशी मुहूर्तावर गुंतवणूक करणे शुभ मानले जाते.

त्यामुळे या वेळी बरेच व्यापारी आणि गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक करतात, त्यामुळे या वेळी बाजारात प्रचंड अस्थिरता (Volatility) असते.

दिवाळीत मुहूर्ताच्या दिवशी शेअर बाजारात गुंतवणूक का करतात ?

जसे आपणा सर्वांना माहित आहे की दिवाळीच्या दिवशी आपण देवी लक्ष्मीची पूजा करतो आणि भारतीय संस्कृतीत देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते. त्यामुळे मुहूर्त ट्रेडिंग दिवशी गुंतवणूक करणे अत्यंत शुभ मानले जाते.

मुहूर्त ट्रेडिंगचा इतिहास.

मुहूर्त ट्रेडिंगची सुरुवात BSE ने 1957 मध्ये आणि NSE ने 1992 मध्ये केली आणि तेव्हापासून स्टॉक मार्केटमध्ये मुहूर्त ट्रेडिंग सुरू झाले.

मुहूर्त ट्रेडिंग दिवस आणि वेळ.

मुहूर्त आणि दिवाळीमुळे मुहूर्त ट्रेडिंगची वेळ आणि दिवस दरवर्षी बदलतात.

या वर्षी २०२२ मध्ये मुहूर्ताची वेळ दिवाळीच्या दिवशी म्हणजेच 24 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 6.15 ते 7.15 दरम्यान असणार आहे.

हे सहसा 3 भागांमध्ये होईल.

  • पहिले Opening Session असेल जे संध्याकाळी 6 ते 6.15 दरम्यान असेल.
  • दुसरे Trading Session संध्याकाळी 6.15 ते 7.15 दरम्यान असेल, ज्यामध्ये ट्रेडिंग केले जाईल म्हणजेच शेअर्स ह्या दरम्यान खरेदी आणि विक्री केले जातील.
  • तिसरे Closing Session सायंकाळी 7.15 वाजता होईल.

निष्कर्ष

जर तुम्ही शेअर बाजारात नवीन असाल किंवा गुंतवणुकीची योग्य संधी शोधत असाल तर या शुभ दिवशी तुम्ही तुमची गुंतवणूक सुरू करू शकता.

मुहूर्त ट्रेडिंग काय असते ? आणि वेळ व दिवस हे नक्कीच तुम्हाला कळाले असेल .

जर तुम्हाला हा मुहूर्त ट्रेडिंगविषयी मराठी लेख आवडला असेल तर आपल्या मित्र परिवारा शोभत नक्की share करा.

हा लेख हिंदी मध्ये वाचा :- दिवाली मुहूर्त ट्रेडिंग से करे शुभ निवेश माँ लक्ष्मी के आशीर्वाद से।

FAQ

दिवाळीत मुहूर्तावर गुंतवणूक करणे शुभ का मानले जाते ?

जसे आपणा सर्वांना माहित आहे की दिवाळीच्या दिवशी आपण देवी लक्ष्मीची पूजा करतो आणि भारतीय संस्कृतीत देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते. त्यामुळे मुहूर्त ट्रेडिंग दिवशी गुंतवणूक करणे अत्यंत शुभ मानले जाते.

२०२२ मध्ये मुहूर्त ट्रेडिंग कोणत्या दिवशी आणि वेळी केली जाणार आहे.

या वर्षी २०२२ मध्ये मुहूर्ताची वेळ दिवाळीच्या दिवशी म्हणजेच 24 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 6.15 ते 7.15 दरम्यान असणार आहे.

मुहूर्त ट्रेडिंग काय असते ?

शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग हे एक धार्मिक कार्य आहे, जे दरवर्षी केले जाते . ज्यामध्ये दिवाळीच्या दिवशी शेअर बाजारात 1 तास गुंतवणूक केली जाते, कारण भारतात दिवाळीच्या दिवशी मुहूर्तावर गुंतवणूक करणे शुभ मानले जाते.

शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग ची सुरवात कधी झाली ?

मुहूर्त ट्रेडिंगची सुरुवात BSE ने 1957 मध्ये आणि NSE ने 1992 मध्ये केली आणि तेव्हापासून स्टॉक मार्केटमध्ये मुहूर्त ट्रेडिंग सुरू झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *