Index Fund म्हणजे काय

Index Fund म्हणजे काय ? Mutual fund चा उत्तम पर्याय.

ह्या मराठी लेख द्वारे आपण जाणून घेणार आहोत कि Index Fund म्हणजे काय ?Mutual fund आणि index fund यान मध्ये अंतर काय आहे ? आणि इंडेक्स फंड मध्ये गुंतवणूक केली पाहिजे किंवा नाही इत्यादी.

इंडेक्स फंड हा एक प्रकारचा mutual fund असतो. ज्या प्रकारे mutual फंड मध्ये पैसे गुंतवले जातात गुंतवणूकदारांकडून तसेच इंडेक्स फंड मध्ये हि पैसे गुंतवले जातात.

स्टॉक इंडेक्स मध्ये वेगवेगळ्या कंपनीचे स्टॉक असतात, ज्या मध्ये त्यात उपस्थित असलेल्या स्टॉकची average performance दिसते .

जसे कि sensex हा ३० कंपन्यांनी आणि Nifty हा ५० कंपन्यांनी बनलेला इंडेक्स आहे आणि त्या इंडेक्स मध्ये प्रत्येक कंपनीचा वेगवेगळा वाटा आहे.

1.Mutual fund आणि Index fund मध्ये अंतर.

Mutual fund आणि Index fund मध्ये सर्वात मोठे अंतर हे आहे कि,

Mutual fund मध्ये मॅनेजर स्वतः प्रमाणे कंपनींच्या स्टॉकची निवड करून त्या मध्ये गुंतवणूक करतो.

Index Fund मध्ये स्टॉक मार्केट मध्ये असलेल्या इंडेक्स मध्येच गुंतवणूक केली जाते जसे कि, Nifty50, Nifty next 50, इत्यादि.

 2.Index Fund ची सुरवात कधी झाली.

जगामध्ये इंडेक्स फंड ची सुरवात अमेरिके मध्ये झाली. Qualidex Fund ने 1967 मध्ये पहिला इंडेक्स फंड सुरु केला जी एक asset management कंपनी होती. हा फंड  Index Dow Jones Industrial Average ह्या इंडेक्स वर आधारित होता.

जगामध्ये John C. Bogle ह्यांनी इंडेक्स फंड प्रसिद्ध केला.इंडेक्स फंड बद्दल त्यांच्या काही प्रसिद्ध उदाहरणे आहेत.

१. “The mutual fund industry has been built, in a sense, on witchcraft.”

२. “Buying funds based purely on their past performance is one of the stupidest things an investor can do.”

३. “The two greatest enemies of the equity fund investor are expenses and emotions.”

४. “When there are multiple solutions to a problem, choose the simplest one.”

-John C. Bogle.

जॉन सी. बोगल यांचा असा विश्वास होता की कोणताही म्युच्युअल फंड शेअर बाजारात दीर्घकाळासाठी जंगले रिटर्न देऊ शकत नाही.

म्हणूनच त्यांनी सांगितले की म्युच्युअल फंडांपेक्षा इंडेक्स फंडात गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्न भेटतील.

3.इंडेक्स फंड कसे काम करते ?

उदाहरणार्थ, आपण Nifty ५० हा इंडेक्स घेऊया.

एक इंडेक्स फंड आहे जो निफ्टी 50 वर आधारित आहे, त्यामुळे या इंडेक्सच्या पोर्टफोलिओमध्ये निफ्टी 50 च्या 50 कंपन्या असतील.

निफ्टी 50 मधील शेअरचा जसा ratio असेल, तसाच ratio त्या इंडेक्स फंडातील शेअरचा असेल.

जर एखादी कंपनी निफ्टी 50 च्या बाहेर गेली, तर तो इंडेक्स फंड त्या स्टॉकचे शेअर्स इंडेक्स मधून विकतो आणि जर एखादी नवीन कंपनी निफ्टी 50 मध्ये आली तर तो इंडेक्स त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतो.

जसे निफ्टी ५० वर किंवा खाली जाईल, तसे इंडेक्स फंड वर किंवा खाली जाईल आणि जसा निफ्टी रिटर्न देईल, त्याचप्रमाणे इंडेक्स फंड देखील रिटर्न देईल.

Index Fund शेअर बाजारातील इंडेक्सची नकल करतो.

अशा प्रकारे इंडेक्स फंड काम करतात.

4.इंडेक्स फंडांचे फायदे.

इंडेक्स फंडांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांचा expense ration कमी असतो.

जेथे म्युच्युअल फंडचा expense ration 1-2%असतो, तेथे इंडेक्स फंडचा expense ration 0.०५ ते 0.75 पर्यंत असतो.

इंडेक्स फंडचा expense ration कमी असतो कारण इंडेक्स फंड हे index ची नक्कल करतात, ज्यामुळे फंड मॅनेजरला स्टॉक शोधण्यात आणि फंड वर लक्ष देण्यावर फार कष्ट करावे लागत नाहीत.

Index Fund- marathi

इंडेक्स फंडाचा दुसरा सर्वात मोठा फायदा म्हणजे गुंतवणुकीवर diversification. इंडेक्स फंडांमध्ये, आपले पैसे इंडेक्समध्ये समाविष्ट असलेल्या सर्व कंपन्यांमध्ये गुंतवले जातात.

कंपनीची खराब कामगिरी किंवा उद्योगाची खराब कामगिरी यामुळे आपल्या गुंतवणुकीत फारसा फरक पडत नाही आणि आपली गुंतवणूक निर्देशांकानुसार वाढतच राहते.

उद्या कोणती कंपनी असेल किंवा नसेल हे सांगता येत नाही, पण इंडेक्स फंड नक्कीच असेल आणि कालांतराने नवीन कंपन्या इंडेक्समध्ये येत राहतील.

कमी वेळा साठी इंडेक्स फंड खाली जाऊ शकतो परंतु दीर्घकाळात इंडेक्स फंड वरच जाईल.

5.निष्कर्ष

म्युच्युअल फंडांपेक्षा इंडेक्स फंड हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे.

जेथे सामान्य गुंतवणूकदाराला जास्त पैसे द्यावे लागत नाही आणि हे इंडेक्स फंड शेअर मार्केटमधील इंडेक्सची नक्कल करतात, त्यामुळे सामान्य गुंतवणूक चिंतामुक्तअसतो.

जर तुम्हाला Index Fund म्हणजे काय ? हा मराठी लेख आवडला असेल तर मित्रपरिवारा सह नक्की शेअर करा.

हा लेख हिंदी मध्ये वाचा :- Index Fund – Mutual Fund का बेहतरीन विकल्प।

6.FAQ

Q.1.Index Fund म्हणजे काय ?

इंडेक्स फंड हा एक प्रकारचा mutual fund असतो, जो शेअर बाजारात असलेल्या इंडेक्स ची नकल करतो.
स्टॉक इंडेक्स मध्ये वेगवेगळ्या कंपनीचे स्टॉक असतात, ज्या मध्ये त्यात उपस्थित असलेल्या स्टॉकची average performance दिसते .

Q.2.Index Fund ची सुरवात कधी आणि केव्हा झाली ?

जगामध्ये इंडेक्स फंड ची सुरवात अमेरिके मध्ये झाली. Qualidex Fund ने 1967 मध्ये पहिला इंडेक्स फंड सुरु केला जी एक asset management कंपनी होती. हा फंड  Index Dow Jones Industrial Average ह्या इंडेक्स वर आधारित होता. जगामध्ये John C. Bogle ह्यांनी इंडेक्स फंड प्रसिद्ध केला.

Q.3.Mutual Fund आणि Index Fund मध्ये अंतर काय आहे ?

Mutual fund आणि Index fund मध्ये सर्वात मोठे अंतर हे आहे कि,
Mutual fund मध्ये मॅनेजर स्वतः प्रमाणे कंपनींच्या स्टॉकची निवड करून त्या मध्ये गुंतवणूककरतात .
Index Fund मध्ये स्टॉक मार्केट मध्ये असलेल्या इंडेक्स मध्येच गुंतवणूक केली जाते जसे कि, Nifty50, Nifty next 50, इत्यादि.

Q.4.Index Fund चा expense ration Mutual Fund पेक्षा कमी का असतो ?

जेथे म्युच्युअल फंडचा expense ration 1-2%असतो, तेथे इंडेक्स फंडचा expense ration 0.०५ ते 0.75 पर्यंत असतो.
इंडेक्स फंडचा expense ration कमी असतो कारण इंडेक्स फंड हे index ची नक्कल करतात, ज्यामुळे फंड मॅनेजरला स्टॉक शोधण्यात आणि फंड वर लक्ष देण्यावर फार कष्ट करावे लागत नाहीत. त्या मुळे त्या फंड ला मेंटेन करण्याचा खर्च वाचतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *