शेअर मार्केट मध्ये निर्देशांक (Index) म्हणजे काय

शेअर मार्केट मध्ये निर्देशांक (Index) म्हणजे काय ?

आज ह्या मराठी लेख द्वारे आपण जाणून घेणार आहोत कि शेअर बाजारात इंडेक्स काय असतात?, ते काम कसे करतात ? आणि त्यांचा उपयोग.

Index हे एक प्रकारचे इंडिकेटर असते ज्याने एखाद्या मार्केट किंवा सेक्टर मध्ये कोणताही बदल होत असेल तर ते इंडेक्स द्वारे आपण बघू शकतो.

७,००० पेक्षा जास्त कंपन्या NSE आणि BSE वर लिस्ट आहेत.

ह्या ७००० कंपन्यांन पैकी प्रत्येक कंपनीचं प्रदर्शन दाखवून शेअर बाजारात काय होत आहे आणि शेअर बाजाराची दिशा दाखवणे हे खुप कठीण आहे.

त्यामुळे प्रत्येक कंपनीचं प्रदर्शन दाखवण्याच्या ऐवजी एक सारख्या कंपनीचा गट बनवून त्या कंपनीचा निर्देशांक म्हणजेच index बनवले जातात. ज्याने शेअर मार्केट मध्ये होणारी हालचाल समजणे खूप सोपे जाते.

1.इंडेक्स चे प्रकार.

ह्या शेअर्स चे अनेक आधारावर इंडेक्स बनवले जाऊ शकतात.

जसे कि शेअर चे,

  • Market Capitalization किती आहे ?
  • Sector कोणता आहे ?
  • Stock Price किती आहे

Market Capitalization च्या आधारावर इंडेक्स ची उदाहरणे आहेत Nifty small cap index, BSE mid cap index.

Sensex आणि Nifty ५० हे Large Cap ची उदाहरणे आहेत.

Market Capitalization च्या आधारावर इंडेक्स ची उदाहरणे आहेत, Nifty Bank Index, Nifty Metal Index.

वरील सगळी उदाहरणे Stock Index ची आहेत.

ह्याच प्रमाणे Bond Market, Commodity Marketचे पण इंडेक्स आहेत.

अजून वेगळ्या प्रकार चे पण इंडेक्स आहेत.

जसे कि Volatility Index ज्या मध्ये तुम्हाला शेअर बाजारात किती स्थिरता किंवा अस्थिरता आहे हे समजते.

2.इंडेक्स ची किंमत कशी ठरवली जाते ?

इंडेक्स मध्ये खुप स्टॉक असतात, प्रत्येक स्टॉक च्या किमतीला जोडून इंडेक्स ची किंमत काढली जाते.जर इंडेक्स मधील कोणत्याही स्टॉक च्या किमती मध्ये बदल होतो तर त्यामुळे इंडेक्स च्या किमती मध्ये हि बदल होतो.

जसे कि Sensex मध्ये भारतातील सर्वोत्तम ३० कंपन्यांचा समावेश आहे आणि

Nifty ५० मध्ये भारतातील सर्वोत्तम५० कंपन्यांचा समावेश आहे.

जर ह्या मध्ये कोणत्याही स्टॉक च्या किमती मध्ये बदल झाला तर ह्या इंडेक्स मध्ये हि बदल होतो.

प्रत्येक स्टॉक ची किंमत किंवा market capitalization वेगळे असते त्यामुळे त्या स्टॉक चा भाग इंडेक्स मध्ये वेगळा असतो.

उदाहरणार्थ Nifty 50 मध्ये,

  • Reliance Industries Ltd.चा भाग 11.51% आहे.
  • HDFC Bank Ltd. चा भाग 8.36% आहे.
  • ICICI Bank Ltd. चा भाग 7.57% आहे.
  • Infosys Ltd. चा भाग 7.54% आहे.
  • Housing Development Finance Corporation Ltd. चा भाग 5.72% आहे.
Stock market index in marathi

3.Index चे फायदे.

1.Mutual Fund ची निवड.

जसे कि तुम्हाला माहित आहे कि mutual fund इंडेक्स ला follow करतात.

जर तुम्हाला mutual fund ची निवड किंवा त्याचा performance बघायचा असेल तर इंडेक्स चा उपयोग करू शकतो.

2.शेअर मार्केट ची दिशा.

जेव्हा आपण nifty किंवा sensex ला पाहतो तेव्हा आपल्याला मार्केट काय चालले आहे हे माहित पडते.

तसेच आपल्याला अन्य मार्केट किंवा सेक्टर मध्ये काय चालले आहे हे समजायचे असेल तर ते इंडेक्स बघू शकतो.

3.Sentiment Indicator

देशात किंवा जगात कोणतीही मोठी घटना घडली की त्या गोष्टीचा लोकांवर आणि बाजारावर काय परिणाम होतो हे कळायला मदत होते.

4.Index fund आणि ETF.

खूप सारे index fund आणि ETF इंडेक्स च्या आधारावर बनलेले असतात.म्हणजे जे शेअर इंडेक्स मध्ये ज्या प्रमाणात असतील त्याच प्रमाणात ते शेअर इंडेक्स फंड आणि ETF मध्ये विभागलेले असतात.

ह्या प्रमाणे इंडेक्स चे फायदे शेअर बाजारात होतात.

4.निष्कर्ष

इंडेक्स चा वापर करून आपण कोणताही सेक्टर किंवा मार्केट च्या स्टॉक मध्ये ट्रेडिंग किंवा इन्वेस्टींग करू शकतो.

शेअर मार्केट मध्ये निर्देशांक (Index) म्हणजे काय ? हा मराठी लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारासह नक्की Share करा.

हा लेख हिंदी मध्ये वाचा :- शेयर मार्किट में Stock Index क्या होते हैं ? हिंदी में।

5.FAQ

Q.1.शेअर मार्केट मध्ये निर्देशांक (Index) म्हणजे काय ?

Ans: Index हे एक प्रकारचे इंडिकेटर असते ज्याने एखाद्या मार्केट किंवा सेक्टर मध्ये कोणताही बदल होत असेल तर ते इंडेक्स द्वारे आपण बघू शकतो.

Q.2.इंडेक्स ची किंमत कशी ठरवली जाते ?

Ans: इंडेक्स मध्ये खुप स्टॉक असतात, प्रत्येक स्टॉक च्या किमतीला जोडून इंडेक्स ची किंमत काढली जाते.जर इंडेक्स मधील कोणत्याही स्टॉक च्या किमती मध्ये बदल होतो तर त्यामुळे इंडेक्स च्या किमती मध्ये हि बदल होतो.

Q.3.शेअर मार्केट मध्ये Index चे फायदे.

Ans: देशात किंवा जगात कोणतीही मोठी घटना घडली की त्या गोष्टीचा लोकांवर आणि बाजारावर काय परिणाम होतो हे कळायला इंडेक्स ची मदत होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *