शेअर मार्केटमध्ये Supply and Demand काय आहे- Marathi

शेअर मार्केटमध्ये Supply and Demand काय आहे? । शेअर मार्केटमध्ये पुरवठा आणि मागणी काय आहे?

आज आपण ह्या मराठी लेख मध्ये जाणून घेणार आहोत की शेअर बाजारातील Supply आणि Demand zone कोणते आहेत? त्यांचे level काय आहेत? ते कसे काम करतात ? आणि त्यांचा उपयोग.

  • Supply आणि Demand हे technical analysis चे मुख्य आधार आहेत.
  • Supply आणि Demand च्या आधारावर्ती technical chart बनतात.
  • Supply आणि Demand च्या आधारावर्ती बाजार किंमती मध्ये हालचाल होते.

शेअर मार्केटमध्ये Supply म्हणजे काय?

मराठीमध्ये Supply म्हणजे पुरवठा.

जेव्हा price चार्टवरील कोणत्याही एका लेवलला स्पर्श करते आणि resistance घेऊन वारंवार खाली जाते, तेव्हा आपण त्याला Supply म्हणतो.

शेअर मार्केटमध्ये Demand म्हणजे काय?

मराठीमध्ये Demand म्हणजे मागणी.

जेव्हा price चार्टवरील कोणत्याही एका लेवलला स्पर्श करते आणि support घेऊन पुन्हा पुन्हा वर जाते, तेव्हा आपण त्याला Demand म्हणतो.

Technical analysis मध्ये Supply आणि Demand चे आधार.

Technical analysis मध्ये Supply आणि Demand चे Uptrend, Downtrend आणि Sideways ३ मुख्य आधार आहेत.

Uptrend

जेव्हा एखाद्या वस्तूचा पुरवठा (Supply ) कमी असतो आणि मागणी जास्त असते तेव्हा त्या वस्तूची किंमत वाढते, त्याला आपण Uptrend म्हणतो.

Downtrend

जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी (Demand ) कमी असते आणि पुरवठा जास्त असतो तेव्हा त्या वस्तूची किंमत कमी होते, त्याला आपण Downtrend म्हणतो.

Sideways

जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी आणि पुरवठा समान असते , तेव्हा किंमत एका मर्यादेत फिरते त्याला आपण Sideways ट्रेंड म्हणतो.

शेयर मार्किट मध्ये Supply Level आणि Demand Level म्हणजे काय ?

शेयर मार्किट मध्ये Supply आणि Demand अश्या २ Level असतात.

Demand Level

Technical-analysis-Supply-level-marathi
  • जेव्हा किंमत कोणत्याही एका level वर वारंवार support घेऊन वर जाते.
  • तेव्हा त्या level वर supply पेक्षा demand जास्त आहे असे मानले जाते.
  • येथे बाजार वरती जाण्याची अधिक शक्यता असते.

Supply Level

Technical-analysis-Demand-level-marathi
  • जेव्हा किंमत कोणत्याही एका level वर वारंवार resistance घेऊन खाली जाते.
  • तेव्हा त्या level वर demand पेक्षा supply जास्त आहे असे मानले जाते.
  • येथे बाजार खालती जाण्याची अधिक शक्यता असते.

शेयर मार्किट मध्ये Supply आणि Demand Zone म्हणजे काय ?

Demand Zone

Technical-analysis-Supply-Zone-marath
  • जेव्हा किंमत एखाद्या झोन वर वारंवार support घेऊन वर जाते.
  • तेव्हा त्या लेवल वर Supply पेक्षा Demand जास्त आहे असे मानले जाते.
  • येथे बाजार वाढण्याची अधिक शक्यता आहे.

Supply Zone

Technical-analysis-Demand-Zone-marathi
  • जेव्हा किंमत एखाद्या झोन वर वारंवार resistance घेऊन खाली जाते.
  • तेव्हा त्या झोन वर Demand पेक्षा Supply जास्त आहे असे मानले जाते.
  • येथे बाजारात मंदीची शक्यता जास्त आहे.

स्टॉक मार्केटमध्ये Supply आणि Demand यांचा उपयोग.

स्टॉक मार्केटमध्ये Supply आणि Demand यांच्या आधारे ट्रेडर्स किंवा इन्वेस्टर्स ला हे समझते कि ह्या Supply आणि Demand लेव्हल्स किंवा झोन वरून शेअर वरती जाणार कि खाली.जेणे करून ट्रेडिंग करणे सोपे होऊन जाते.

निष्कर्ष

शेअर मार्केटमध्ये Supply and Demand काय आहे? हा मराठी लेख तुम्हाला आवडला असेल तर मित्र परिवारासह नक्की शेअर करा .

हा लेख हिंदी मध्ये वाचा :- शेयर मार्किट में Supply and Demand क्या हैं ? In Hindi

FAQ

शेअर मार्केटमध्ये Supply म्हणजे काय?

मराठीमध्ये Supply म्हणजे पुरवठा.
जेव्हा price चार्टवरील कोणत्याही एका लेवलला स्पर्श करते आणि resistance घेऊन वारंवार खाली जाते, तेव्हा आपण त्याला Supply म्हणतो.

शेअर मार्केटमध्ये Demand म्हणजे काय?

मराठीमध्ये Demand म्हणजे मागणी.
जेव्हा price चार्टवरील कोणत्याही एका लेवलला स्पर्श करते आणि support घेऊन पुन्हा पुन्हा वर जाते, तेव्हा आपण त्याला Demand म्हणतो.

शेअर मार्केटमध्ये Supply and Demand काय आहे?

Supply आणि Demand हे technical analysis चे मुख्य आधार आहेत.
Supply आणि Demand च्या आधारावर्ती technical chart बनतात.
Supply आणि Demand च्या आधारावर्ती बाजार किंमती मध्ये हालचाल होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *