शेअर मार्केट मध्ये Risk Reward Ratio म्हणजे काय - Marathi

शेअर मार्केट मध्ये Risk Reward Ratio म्हणजे काय ?

ह्या मराठी लेख द्वारे आपण जाणून घेणार आहोत कि, शेअर मार्केट मध्ये Risk Reward Ratio म्हणजे काय ? Risk Reward Management कसे करावे? आणि त्याचा स्टॉक मार्केट मध्ये वापर कसा करावा इत्यादी.

आपण कोणतीही काम करण्या आधी जाणून घेतो कि हे काम केल्यावर मला फायदा किती होईल आणि माझे नुकसान किती होईल ते ठरवल्या नंतरच आपण ते काम करण्यास सुरु करतो.

ह्यालाच आपण इंग्रजीत Risk Reward Ratio म्हणतो. म्हणजे आपल्याला हे काम केल्यावर तोटा किती होईल आणि नफा किती होईल.

आज हाच नियम आपल्याला शेअर बाजारामध्ये कसा वापरायचा हे जाणून घेणार आहोत.

Risk Reward Ratio ला आपण Money Management किंवा Risk Management सुद्धा म्हणू शकतो.

रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे, शेअर मार्केटमध्ये आपण किती जोखीम घेतली पाहिजे आणि त्या जोखमीच्या आधारावर आपल्याला किती रिवॉर्ड किंवा नफा मिळाला पाहिजे.

1.जाणून घ्या Risk Reward Ratio.

जेव्हा ट्रेडर्स Technical Analysis चा उपयोग करून मार्केट मध्ये ट्रेडिंग करता तेव्हा १०० % खात्री नसते कि नफाच होईल.

Technical Analysis च्या द्वारे तुम्ही ७० % बरोबर असू शकता म्हणजे, तुम्ही १० ट्रेड घेतले तर तुम्हाला ७ ट्रेड मध्ये नफा आणि ३ ट्रेड मध्ये तोटा होणारच.आणि हा तोटा इतका मोठा असतो कि ७ नफ्या मध्ये तुम्ही जितके पैसे कमवलेत ते सर्व बुडून जातील.

तो लॉस कमी करण्या साठी आपण एक पद्धत वापरतो त्यालाच Risk Reward Ratio असे म्हणतात.

जेव्हा एखाद्या ट्रेड मद्ये आपल्याला लॉस होऊ शकतो तर तो लॉस आपण रिस्क रिवॉर्ड च्या मदतीने कमी करू शकतो.

Risk Reward Ratio - Marathi

1.Risk Reward Ratio Theory

Risk Reward Ratio Theory चे खूप सारे नियम आहेत त्या पैकी एक म्हणजे १:३.

याचा अर्थ असा की जर तुम्ही ट्रेड घेत असाल आणि तुमचा स्टॉप लॉस रु 10 असेल तर तुमचे टार्गेट रु 30 असेल.

म्हणजे जर तुम्हाला १० रुपयांचा लॉस होत असेल तर तुम्ही त्या ट्रेड मधून निघून जाणार आणि जर प्रॉफिट होत असेल तर ३० रुपयांचा प्रॉफिट झाल्यावरच तुम्ही त्या ट्रेड मधून बाहेर पडणार.

जेणे करून तुम्हाला नफा जास्त होईल आणि तोटा झालाच तर तो कमी होईल.

Risk Reward Ratio चे १:१,१:२,२:४, असे वेगवेगळे नियम आहेत.

2.शेअर बाजारात Risk Management कसे करावे ?

जर तुम्हाला तुमचे पैसे वाचवायचे असतील तर तूम्हाला पैश्यांचे Risk Management करणे हे आलेच पाहिजे.

1.ट्रेडिंग किंवा शेअर बाजारा मध्ये लोकांना लॉस का होतो ?

  • बहुतेक गुंतवणूकदार किंवा ट्रेडर लवकर नफा मिळवण्याच्या अपेक्षेने शेअर बाजारात येतात कोणतेही ज्ञान न घेता आणि या अपेक्षेने ते स्वतःचे नुकसान करतात .
  • ते गरजेपेक्षा जास्त पैसे स्टॉकमध्ये गुंतवतात आणि शेवटी त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहत नाहीत.
  • नवीन ट्रेडर जेव्हा ट्रेडिंग सुरू करतो तेव्हा त्याला ट्रेडिंगचा अनुभव नसतो.
  • ट्रेडिंग कशीकरायची, ते ट्रेडिंग करूनच शिकता येतं.
  • हे शिकत असताना तुमचे खूप नुकसान होऊ शकते, मग ट्रेडर साठी रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय? हे समझून घेणं खूप गरजेचं आहे.
  • या बाजारात ट्रेडर किती जोखीम पत्करू शकतो हे रिस्क मॅनेजमेंट द्वारे तो जाणून घेऊ शकतो.

2.Risk Management जाणून घ्या.

रिस्क रिवॉर्ड रेशोमध्ये 2% चा नियम जगभर प्रसिद्ध आहे.

2% चा नियम असा आहे कि, तुमच्याकडे कोणतीही रक्कम असल्यास तुम्ही त्या रकमेच्या 2% पेक्षा जास्त जोखीम नाही घेतली पाहिजे.

शेअर बाजारात खूप गोंधळ आहे, जर शेअर तुमच्या ट्रेड च्या दिशेने गेला तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.

पण ट्रेड तुमच्या दिशेच्या विरुद्ध गेला तर तुमचे सर्व पैसे बुडू शकतात.

त्यामुळे जर तुम्ही 2% च्या नियमानुसार रिक्‍स घेतली तर तुमच्या भांडवली मधील फक्त 2% च नुकसान होईल.

3.निष्कर्ष

जर तुम्हाला या मार्केटमध्ये चांगला नफा हवा असेल आणि तोटा टाळायचा असेल, तर तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे काय? हे जाणून घ्यावे लागेल आणि त्या नियमांचे पालन करावे लागेल.

जर तुम्हाला हा मराठी लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारसह नक्की Share करा.

हा लेख हिंदी मध्ये वाचा:- शेयर मार्केट में Risk Reward Ratio को जाने in Hindi .

4.FAQ

Q.1.Risk Reward Ratio म्हणजे काय?

Ans: रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे, शेअर मार्केटमध्ये आपण आपल्या पैश्यांवर किती जोखीम घेतली पाहिजे आणि त्या जोखमीच्या आधारावर आपल्याला किती रिवॉर्ड किंवा नफा मिळाला पाहिजे.

Q.2.Risk Reward Ratio चा फायदा काय आहे ?

Ans: जर तुम्हाला या मार्केटमध्ये चांगला नफा हवा असेल आणि तोटा टाळायचा असेल, तर तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशो चा वापर आलाच पाहिजे.
Risk Reward Ratio चा सर्वात मोठा फायदा हा आहे कि,आपण आपला तोटा आणि नफा किती होणार हे आधीच ठरवतो जेणे करून तोटा
कमी करून नफा वाढवू शकतो.

Q.3.शेअर बाजारा मध्ये लोकांना लॉस का होतो ?

Ans: बहुतेक गुंतवणूकदार किंवा ट्रेडर लवकर नफा मिळवण्याच्या अपेक्षेने शेअर बाजारात येतात कोणतेही ज्ञान न घेता आणि या अपेक्षेने ते स्वतःचे नुकसान करतात .
ते गरजेपेक्षा जास्त पैसे स्टॉकमध्ये गुंतवतात आणि शेवटी त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहत नाहीत.
नवीन ट्रेडर जेव्हा ट्रेडिंग सुरू करतो तेव्हा त्याला ट्रेडिंगचा अनुभव नसतो. शेअर बाजाराचे शिक्षण नसल्या कारणाने शेअर बाजारात लोकांना लॉस का होतो किंवा ते पैसे गमावतात ?

Q.4.रिस्क रिवॉर्ड रेशोमध्ये 1:3 नियम काय आहेत?

Ans: याचा अर्थ असा की जर तुम्ही ट्रेड घेत असाल आणि तुमचा स्टॉप लॉस रु 10 असेल तर तुमचे टार्गेट रु 30 असेल.
जर तुम्हाला १० रुपयांचा लॉस होत असेल तर तुम्ही त्या ट्रेड मधून निघून जाणार आणि जर प्रॉफिट होत असेल तर ३० रुपयांचा प्रॉफिट झाल्यावरच तुम्ही त्या ट्रेड मधून बाहेर पडणार.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *